Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : खानदेशात शहादा तालुका ऊस लागवडीत पुढे; पाण्याच्या उपलब्धतेमुळे पिकाला पसंती

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीत यंदाही शहादा तालुका पुढे आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड शहादा तालुक्यात झाली आहे. पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने ऊस पिकाला अनेकांनी पसंती दिली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार ः ऊस लागवडीत यंदाही शहादा तालुका पुढे आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड शहादा तालुक्यात झाली आहे. पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने ऊस पिकाला अनेकांनी पसंती दिली आहे.

शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड करण्यास पसंती दिली आहे. शहादा तालुक्यात यंदाही सुमारे साडेआठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. तर नंदुरबारमधील ऊसलागवड सुमारे १५ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. मागील वेळेस शहाद्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक होते.

नंदुरबारमधील अनेक शेतकरी नजीकच्या मध्य प्रदेश, गुजरातमधून ऊस बेणे किंवा बियाणे आणतात. तेथील रोपवाटिकांतून ऊस रोपे खरेदीवरही शेतकऱ्यांचा भर होता. स्थानिक भागातील काही शेतकऱ्यांकडील दर्जेदार ऊस पिकातील बेणेही घेण्यासंबंधी शेतकऱ्यांनी नियोजन केले. खानदेशात जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ ते १३ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. धुळ्यातही सुमारे पाच हजार हेक्टरवर ऊस आहे.

खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा यंदाही आघाडीवर आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते. शेतीमालास खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे शेतकरी अलीकडे ऊस लागवडीला पसंती देत आहेत. नंदुरबारलगत गुजरात व मध्य प्रदेशातील कारखानेही ऊस खरेदी करतात. नंदुरबार जिल्ह्यात तीन कारखाने गतीने तोड करीत आहेत.

ऊस तोडणीसंबधी अडचणीही कमी आहेत. शहादा तालुक्यात पाणी मुबलक आहे. केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेण्यातही शहादा आघाडीवर आहे. काही वर्षांपासून मजुरांची टंचाई आहे. दुसरीकडे कापूस पीक परवडत नाही. कलिंगड, केळी पिकात जोखीम आहे. मिरचीतही फारसा नफा हाती राहत नाही. मिरची पिकाची हानी दुष्काळाने, ओल्या दुष्काळात झाली.

मजुरी खर्च कमी

उसाला मजुरी खर्च काहीसा कमी आहे. कीटकनाशकांची फवारणीही फारशी करावी लागत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळत आहेत. लागवडीसाठी सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना रोपवाटिकाचालक व काही कारखान्यांनी उपलब्ध करून दिले. कारखानदारांकडून उसाला कमी दर दिला जात आहे. पण कमी जोखीम व मजुरांची समस्या यामुळे ऊस पीक कमी करण्यास शेतकरी तयार नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT