Tribal Development Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : ‘शबरी’च्या प्रशिक्षणार्थींना ‘आरसेटी’चे बळ

Shabri Tribal Development Board : आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असलेल्या शबरी आदिवासी विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाबँक आरसेटी या संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे.

Team Agrowon

Nashik News : आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असलेल्या शबरी आदिवासी विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाबँक आरसेटी या संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे आता शबरीच्या लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या कर्ज योजना, पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प यांसह इतर योजनांमधील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. या सामंजस्य करारामुळे शबरीच्या प्रशिक्षणार्थींना आरसेटीचे बळ मिळणार आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा देखील राबविण्यात येत असतात.

या कार्यशाळेमध्ये दस्तऐवजीकरण, लेखा, विपणन, सोशल मीडिया यांचे प्रशिक्षण दिले जात असते. या सर्व लाभार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी महाबँक आरसेटीच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी मोफत प्रशिक्षण सत्र राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आदिवासी विकास आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आणि महाबँक आरसेटीचे झोनल व्यवस्थापक सी. बी. सिंग यांनी करारनामा हस्तांतरीत केला. या वेळी वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर, सल्लागार पंकज कुलकर्णी, दीपककुमार पाटील, शेषराव ससाणे, सचिन खाडे महाबँक आरसेटीचे संचालक जी. जी. सरोदे आदी उपस्थित होते.

महामंडळाच्या वतीने कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे वितरण होत असतानाच त्या कर्जामधून आदिवासी बांधवांना व्यवसायामध्ये असलेल्या मुलभूत बाबींचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. महामंडळाच्या वतीने वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा राबवून त्यांना सक्षम केले जात असते. महाबँक आरसेटीसमवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्या कर्ज योजना तसेच पथदर्शी दुग्ध प्रकल्प यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.
– लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास
शबरी महामंडळ आणि आरसेटीच्या सामंजस्य कराराचा फायदा नक्कीच आदिवासी बांधवांना होणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी योग्य प्रशिक्षण आरसेटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
– गणेश सरोदे, संचालक, महाबँक आरसेटी नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT