SGU Icon Award Agrowon
ॲग्रो विशेष

SGU Icon Award : चितळे डेअरीचे गिरीश चितळे यांना ‘एसजीयू आयकॉन २०२४’ पुरस्कार

Chitale Dairy : भिलवडी (जि. सांगली) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांना संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने ‘एसजीयू आयकॉन २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : भिलवडी (जि. सांगली) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांना संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने ‘एसजीयू आयकॉन २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते अर्जुन कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत, सचिव श्रेणीक घोडावत, विश्वस्थ विनायक भोसले, अतुल शिंदे, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. चितळे यांच्यासह क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, आरोग्य सेवक डॉ. नथानिएल ससे, समासेवक राहुल व दीपक कदम, टेनिसपटू ऐश्वर्या जाधव या विविध क्षेत्र उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ‘एसजीयू आयकॉन २०२४’ हा पुरस्कार देण्यात आला.

उद्योगपती संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यापीठाच्या वतीने एसजीयू आयकॉन २०२४ हे पुरस्कार दिले जातात. विविध क्षेत्रात दिग्गजांनी केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे मत श्रेणीक घोडावत यांनी व्यक्त केले.

चितळे उद्योग समूह गेल्या ८५ वर्षांहून अधिक काळ कृषी आणि कृषिपूरक उद्योगात कार्यरत आहे. अत्यंत दर्जेदार उत्पादने आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यात हा उद्योग समूह अग्रेसर आहे.

कृषी उद्योगातील योगदानाची दखल घेत चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांना सन्मानित करण्यात येत आहे, असे गौरवोद्गार श्री. घोडावत यांनी व्यक्त केले. या वेळी नीता घोडावत, श्रेया घोडावत, सलोनी घोडवात, विजयचंद घोडावत, जयचंद घोडावत, राजेश व राकेश घोडावत यांच्यासह घोडावत कुटुंबीय उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT