Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizers Shortage : जळगावात खतांची भीषण टंचाई

Fertilizers Update : जळगाव जिल्ह्यात मागील हंगामापेक्षा यंदा अधिकची खतटंचाई आहे. बियाणे बाजारात जशी आर्थिक पिळवणूक झाली, तशीच लूट खतबाजारात सुरू असून, युरिया, १०.२६.२६ ची जादा दरात विक्री सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात मागील हंगामापेक्षा यंदा अधिकची खतटंचाई आहे. बियाणे बाजारात जशी आर्थिक पिळवणूक झाली, तशीच लूट खतबाजारात सुरू असून, युरिया, १०.२६.२६ ची जादा दरात विक्री सुरू आहे.

खतांची मागणी यंदा खरिपात बऱ्यापैकी आहे. कारण पाऊस वेळेत आला व पेरण्याही वेळेत सुरू झाल्या आहेत. पेरण्यांना सुरुवातीपासून गती असल्याने खतांची मागणीही आहे. खतांचा पुरवठा मात्र यंदा हवा तसा नाही. खतांचे पुरवठा लक्ष्यांक जसा मंजूर झाला, तसा मात्र पुरवठा नसल्याने मागील महिन्यात व या महिन्यातही खतटंचाई आहे. युरिया, १०.२६.२६ ही खते दुरापास्त झाली आहे.

असोसिएशन गप्प

जिल्ह्यात खतांचा मोठा काळाबाजार, प्रशासनाकडून चालढकल, मनमानी असा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील खते व बियाणे वितरक असोसिएशन यावर गप्प आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना कुणालाही काहीही देणेघेणे नाही, असा प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याची स्थिती आहे. कापूस बियाणे काळाबाजार सुरू असतानाही असोसिएशन बघ्यांच्या भूमिकेत होती.

हमालीचा प्रश्‍न, शेतकऱ्यांची लूट

खतांची वाहतूक व हमालीसंबधी दर निश्‍चित केले जातात. परंतु हे दर यंदा निश्‍चित करताना वस्तुस्थिती लक्षात घेण्यात आली नाही. हमाली व खते उतरविण्याचे दर अधिकचे लागत असून, हे पैसे खते वितरक, खत विक्रेत्यांकडून कंपन्या वसूल करीत आहेत. यामुळे खत विक्रेत्यांचा नफा कमी झाला आहे.

यामुळे खतांची जादा दरात विक्रीचा प्रकार जळगाव, पाचोरा, चोपडा, रावेर, यावल, अमळनेर, पारोळा, धरणगाव, भुसावळ आदी भागांत सुरू आहे. १०.२६.२६ व युरियाच्या एका गोणीमागे २० ते २५ रुपये जादा आकारले जात आहेत. ग्रामीण भागात एका गोणीमागे ४० ते ४५ रुपये अधिकचे आकारले जात आहेत. कुठेही तपासणी, पाहणी, खत विक्रेते व खतपुरवठादरांसोबत बैठका अशी तत्परता कृषी विभाग दाखवीत नसल्याची स्थिती आहे.

लिंकिंग सक्तीची

युरिया, १०.२६.२६ या खतांवर लिंकिंग सर्रास सुरू आहे. लिंकिंग करणे गुन्हा नाही, असा दम जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागातील खत विक्रेते शेतकऱ्यांना भरत आहेत. युरिया, १०.२६.२६ सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये व अन्य खते घेण्याची सक्ती केली जात आहे. याशिवाय ही खतेच शेतकऱ्यांना दिली जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची वित्तीय लूट होत असून, याकडे कृषी विभाग गांभीर्याने घेऊन कारवाई करीत नसल्याची स्थिती आहे. लेखी तक्रार आल्यानंतर चौकशी करू व दोष असल्यास कारवाई करू, असे नेहमीचे उत्तर कृषी विभाग देवून ढकलूपणा करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संताप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT