Nanded News : केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (०-२००० हेक्टर सिंचन क्षमता) सातवी प्रगणना व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत आहे. यात पूर्ण झालेल्या भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषी व मृद्संधारण विभागाकडील तसेच व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित योजनांचा समावेश होणार आहे.
या प्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण समिती गठित करण्याचे आदेशित केले आहे. यंत्रणेतील सर्व कार्यरत प्रगणकांची माहिती प्राधान्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव मृद् व जलसंधारण विभाग या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन मृद् व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. कांबळे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे २० जानेवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षणातील सूचनेनुसार या कार्यक्रमास प्राधान्य देऊन तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी, जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, माहिती अधिकारी, नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग आहेत.
सदस्य सचिव म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद् व जलसंधारण विभाग हे काम पाहणार आहेत. जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती राज्यस्तरावरून आलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर प्रगणनेच्या कामासाठी प्रगणकांच्या नेमणुका करणे.
प्रगणनेची प्रपत्रे, सूचना संच वाटप करणे तसेच प्रगणनेचे क्षेत्रीय काम विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश, सूचना मार्गदर्शन करणे. समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व कामकाज आढावा वेळोवेळी महसूल विभागीय स्तरावरील संनियंत्रण समितीस व आयुक्त तथा राज्य प्रगणना आयुका कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.