Leopard Attack  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

Leopard Terror : वडगाव पाटोळे येथील मेंढीपालक शेतकरी बाबाजी सोपान पाटोळे यांच्या बंदिस्त गोठ्यातील मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला.

Team Agrowon

Pune News : वडगाव पाटोळे येथील मेंढीपालक शेतकरी बाबाजी सोपान पाटोळे यांच्या बंदिस्त गोठ्यातील मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सात मेंढ्या जागेवरच ठार झाल्या. यात चार नारी सुवर्णा जातीच्या गाभण मादी, तर तीन नर मेंढ्यांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१५) पहाटेच्या सुमारास घडली.

कडूस, दोंदे, वडगाव पाटोळे, चांडोली परिसर बिबट्याच्या वास्तव्याबाबत खेड तालुक्यातील ‘हॉट स्पॉट’ ठरत आहे. परिसरातील पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष करीत आहे. हल्ल्याच्या प्रकाराने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

बिबट्याच्या दहशतीने नागरिक धास्तावले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वडगाव पाटोळे येथील डोंगराच्या बाजूकडील कालव्याकडेच्या पाटोळे वस्तीवरील बाबाजी पाटोळे यांच्या अंशतः बंदिस्त गोठ्यातील मेंढ्यांवर हल्ला केला.

गोठ्याच्या छतावर चढून बिबट्याने गोठ्यापुढील पत्राच्या कंपाउंडमध्ये उतरून मेंढ्यांना लक्ष केले. पाटोळे यांनी प्रायोगिक तत्त्वावर चांगले उत्पन्न देणाऱ्या मेंढ्या पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी कर्नाटक राज्यातून नारी सुवर्णा व विलायती नर आणले आहेत.

यातील चार गाभण मेंढ्या व तीन नर मेंढ्या जागेवरच ठार झाल्या. या हल्ल्यात पाटोळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वनविभागाचे शिरोली वनपरिमंडल अधिकारी गुलाब मुके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

बिबट्यापासून सावधनता बाळगण्याबाबत सूचना दिल्या. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील महिला व नागरिक शेतात जाण्यास घाबरू लागले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक शेतकरी, महिलांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT