Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : सात जणांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Agriculture Department : शेतीमध्ये विविध प्रयोग, उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची कृषी खात्याने दखल घेत जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले.

Team Agrowon

Washim News : शेतीमध्ये विविध प्रयोग, उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची कृषी खात्याने दखल घेत जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे व इतर प्रमुख अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील दिलीप नारायणराव फुके यांना सन २०२२ चा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार देण्यात आला. तर याच वर्षासाठी युवराज पुंडलिक अव्हाळे (रा. जांब, ता. मंगरूळपीर), सन २०२१ वर्षातील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार पूजा अजय ढोक (रा. ईंझोरी, ता. मानोरा), सन २०२० साठी अजय ढोक (रा. ईंझोरी, ता. मानोरा) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय रवींद्र गायकवाड (रा. गायवळ, ता. कारंजा), दिलीप कंकाळ (सेवानिवृत्त अधिकारी, रा. वाशीम) आणि भागवत श्रीराम ढोबळे (बाभूळगाव, ता. जि. वाशीम) यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बीबीएफच्या प्रचार, प्रसारात फुके यांचा वाटा

दिलीप फुके यांनी मागील काही वर्षांत बीबीएफ या तंत्रज्ञानाचा वापर, प्रचार, प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्यामुळे अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन मिळवत आहेत.

अति आणि कमी पावसातही हे तंत्र अतिशय फायदेशीर असल्याने शेतकरी याचा वापर करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली. तसेच इतर पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी चाकोरीबाहेर जात शेतीत प्रयोगशीलता जोपासली आहे. त्यांना या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT