Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : बुलडाणा जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचा पुरस्काराने गौरव

Team Agrowon

Buldana News : मुंबईत रविवारी (२९ सप्टेंबर) विविध कृषी पुरस्कारांचे वाटप राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. या वेळी बुलडाणा जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचा सन्मान झाला. सन २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांसाठी हे शेतकरी निवडण्यात आले होते. सोबतच कृषी सेवारत्न पुरस्कार मेहकर तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे यांना देण्यात आला.

सन २०२० या वर्षासाठी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार शशिकांत पुंडकर (मु. येऊलखेड, ता. शेगाव), युवा शेतकरी पुरस्कार कैलास अर्जुन नागरे (शिवणी आरमाळ, ता. देऊळगावराजा), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार गणेश लक्ष्मण लंबे (रा. माळखेड, ता. मेहकर), सन २०२१ वर्षात कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार पांडुरंग शिंदे (मंगरुळ इसरुळ, ता. चिखली),

युवा शेतकरी पुरस्कार प्रकाश भीमराव रणित (कोकलवाडी, ता. नांदुरा), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार शिवाजी तेजराव भाकरे (कंडारी, ता. नांदुरा), सन २०२२ वर्षासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ः सर्वसाधारण गटातून देविदास एकनाथ जाधव (भुसर, ता. मोताळा) आणि २०२० वर्षासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार तत्कालीन कृषी सहायक विठ्ठल रामेश्वर धांडे (मेहकर) यांना देण्यात आला.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषिखात्याचे वरिष्ठ अधिकारी व राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झाला आहे. इतरही शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्णता जोपासावी, अधिकाधिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. वरील शेतकऱ्यांच्या सन्मानामुळे जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन निश्चित मिळेल.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT