Agriculture Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Theft : खामखेडासह परिसरात कृषिपंप केबल चोरीचे सत्र

Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून खामखेडासह परिसरात कृषी पंपाच्या केबल चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे.

Team Agrowon

Khamkheda News : तालुक्यातील खामखेडासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीला जाण्याचे सत्र जोरात सुरु असून यावर पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक शेतकरी भुरट्या चोरट्यांमुळे त्रस्त झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी खामखेडा सरपंच वैभव पवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खामखेडासह परिसरात कृषी पंपाच्या केबल चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे.

बुधवारी (ता.६) गिरणा नदीकाठी असलेल्या विहिरीच्या मोटारीच्या केबलची जोडणी खंडित करून चोरटे पंप चोरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना शेतातील मजूरला संशय आल्याने त्याने याची माहिती सरपंच पवार यांना दिली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ॲड. शेवाळे आणि निखिल शेवाळे यांनी नदीकाठी असणाऱ्या पुलाजवळ जाऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पसार झाले होते. परंतु चोरीला जाणाऱ्या लाखो रुपयांच्या केबल वाचविण्यात यश आले आहे.

यामुळे १५ ते २० शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून केबल चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. मात्र या चोरट्यांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT