Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

कापूस बियाणे विक्रीस तत्काळ मान्यता द्यावी

‘माफदा’ची गुणनियंत्रण संचालकांकडे मागणी

टीम ॲग्रोवन

नागपूर : राज्यात मॉन्सूनचे आगमन (Monsoon Arrival) लवकर होणार असल्याने शेतकऱ्यांकडून लगतच्या राज्यातून कापूस बियाण्यांची (Cotton Seed) खरेदीची शक्यता आहे. त्यामुळे कापूस बियाणे विक्रीस (Sale Of Cotton Seed) एक जूनपूर्वी प्रतिबंधाचा आदेश रद्द करून तत्काळ कापूस बियाणे विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘माफदा’ने (महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड, सीड्स, डीलर्स असोसिएशन) केली आहे.

‘माफदा’चे महासचिव विपीन कासलीवाल, (Vipin Kasliwal) अध्यक्ष विनोद तराळ (पाटील) यांनी या संदर्भाने निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांना पत्र लिहिले आहे. पत्रानुसार, अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लागावा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे याकरिता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मेपासून शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी ‘माफदा’कडून करण्यात आली होती. या संदर्भाने पत्रही देण्यात आले होते. मात्र त्याऐवजी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. कंपन्यांकडून वितरक ते किरकोळ विक्रेता यांना कापूस बियाणे पुरवण्यासाठी १५ मे ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. तर विक्रेत्यांना १ जूनपासून शेतकऱ्यांना बियाणे विक्री करता येईल. दरम्यान, हवामान खात्याने एक जूनपूर्वीच मॉन्सून राज्यात दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी कृषी सेवा केंद्रावर जात कापूस बियाणे संदर्भाने विचारणा करीत आहेत. परंतु एक जूनपूर्वी विक्री बंदचे आदेश असल्याने विक्रेता व शेतकऱ्यांचा नाइलाज होतो.

राज्यात सध्या असलेल्या धोरणामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी, लगतच्या राज्यातून त्यांच्याद्वारे कापूस बियाणे खरेदीची शक्यता वाढली असून, या प्रकारामध्ये सदोष बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याकरिता माफदा संघटनेची तातडीची ऑनलाइन सभा घेण्यात आली. या सभेमध्ये बियाणे विक्री बाबत राज्याच्या कृषी विभागाने दोन मे रोजी जाहीर केलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा व कापूस बियाणे विक्रीस तत्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व जिल्हा संघटनेच्या अध्यक्षांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मॉन्सून राज्यात यंदा लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे कापूस बियाणे स्थानिक विक्रेत्यांकडून उपलब्ध न झाल्यास बाहेरील राज्यातून शेतकरी अप्रमाणित बियाणे खरेदी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान विचारात घेऊन कापूस बियाणे विक्रीस तत्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी आहे.
विपिन कासलीवाल,महासचिव, माफदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT