Orange Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Export : संत्री घेता विकत की वाटू फुकट?, 'प्रहार'चं अनोखं आंदोलन

Orange Farmer Protest : अमरावतीच्या चांदुर बाजार मध्ये प्रहार संघटनेच्यावतीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन केले.

Swapnil Shinde

Amravati News : बांग्लादेशाने संत्र्यांवर प्रति किलो ८८ रुपये आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूरबाजारमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्‍ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात चांदूरबाजार येथील मुख्य रस्त्यावर गुरुवारी (ता.१९) हे आंदोलन करण्यात आले.

मुख्य रस्त्यावर संत्र्याचे क्रेट ठेवत यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात संत्री विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर संत्रा फळांचे मोफत वाटप करून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मंगेश देशमुख, सभापती राजेंद्र याऊल, रामदास भोजने, मंगेश अर्डक, गजेंद्र गायकी, प्रकाश सायंदे, मोहन भोंगाडे, अक्षय औतकर, सुनील मोहोड, प्रशांत सातपुते, सुमित शेळके, पुरुषोत्तम राऊत, रंगराव राऊत, प्रफुल्ल नवघरे, भीमराव हरणे, अविनाश बायस्कार, सुभाष मेश्राम, सुयोग मेश्राम, नीलेश कडू सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT