Takari Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ताकारी उपसा सिंचन योजनेचे दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू

Irrigation Scheme Update : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे दुसरे उन्हाळी पाणी आवर्तन कडेगाव, खानापूर तालुक्यांतील लाभक्षेत्राची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १२७ किलोमीटरवर मणेराजुरीजवळून वाहत आहे.

Team Agrowon

Sangli irrigation News : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे दुसरे उन्हाळी पाणी आवर्तन कडेगाव, खानापूर तालुक्यांतील लाभक्षेत्राची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १२७ किलोमीटरवर मणेराजुरीजवळून वाहत आहे.

हे पाणी मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी, भोसे (ता. मिरज) या गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

‘ताकारी’चे गेल्या चार दिवसांपूर्वी पाणी सुरू झाले. बारमाही पिकांसह उन्हाळी शेतीला या पाण्याचा फायदा होत आहे. सुरुवातीचे दहा दिवस कडेगाव तालुक्यातील सिंचन क्षेत्राला पाणी दिल्यानंतर पाण्याने खानापूर तालुक्याचीही तहान भागविली.

आता तासगाव तालुक्यातील मणेराजुरीजवळून पाणी वाहत आहे. ऐन उन्हाळ्यातील या पाण्याने लाभक्षेत्रातील पिकांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, दूर पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू करण्यात आले आहेत. टप्पा ३ वरील २ व टप्पा ४ वरील २ पंपांचे पाणी सोनहिरा खोऱ्यातील सिंचन क्षेत्रासाठी सोडण्यात आले आहे. ते पुढे तडसर भागातही जाते.

या पाण्याचा लाभ बारमाही बागायती शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो.

लांबलेला कडक उन्हाळा, परिणामी शेतीला पाण्याची अत्यंत आवश्यकता, तसेच मुख्य कालव्याच्या शेवटच्या टोकाला १४४ किलोमीटरवर पाणी पोहोचवायचे असल्याने किमान पावसाळा सुरू होईपर्यंत कालवा दुथडी भरून वाहण्याची शक्यता डवरी यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT