Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Onion Production : जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. मात्र, खरिपाच्या वेळी घेतलेल्या कांदा लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादकांना साठवण न करता मिळेल त्या भावाने कांदा विकावा लागतो आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. मात्र, खरिपाच्या वेळी घेतलेल्या कांदा लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादकांना साठवण न करता मिळेल त्या भावाने कांदा विकावा लागतो आहे. मात्र रब्बी हंगामात कांदा घेणे व कांदा चाळ तंत्राचा वापर करणे या दोन्ही गोष्टीमुळे कांदा उत्पादकांचा अर्थकारण बदलणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यात सातत्याने कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, हे क्षेत्र खरीप काळातील असल्याने त्याचे अर्थकारण उत्पादकांना पुरेसे फायदेशीर ठरत नाही. कारण उत्पादित कांदा थेट मिळेल त्या भावाने विकावा लागतो. या कांद्याची साठवणूक देखील केली जात नाही. मात्र त्या तुलनेत रब्बी हंगामातील कांद्याचे अर्थकारण अधिक मजबूत आहे.

रब्बीत निघालेला कांदा जूनपर्यंत कांदा चाळीत साठवला जातो. पावसाळ्यात कांद्याचे भाव वाढत असल्याने या स्थितीचा फायदा उत्पादकांना मिळतो. जिल्ह्यातील उत्पादकांनी कांदा अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे आहे.

रब्बी हंगामातील कांद्याचे साठवण तंत्र

पाावसाळ्यामध्ये आर्द्रता ९५ टक्‍क्‍यापर्यंत असते. पाऊस सुरू असतानाची ही अति उच्च आर्द्रता साठवलेल्या कांद्याच्या ढिगामध्ये असलेल्या पोकळीमध्ये शिरते. यामुळे तसेच पावसाळ्यातील पोषक तापमानामुळे ढिगामध्ये साठवलेल्या कांद्यास कोंब येतात व कांदे खराब होतात. कांदाचाळीने हे नुकसान टाळून चांगला भाव मिळेपर्यंत साठवण करता येते.

काय आहेत अडचणी

  • सध्या राज्यात कांदा उत्पादनापैकी खरिपामध्ये ४० टक्के तर रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये ६० टक्के उत्पादन

  • सोलापूर जिल्ह्यात मात्र खरीप कांद्याचे क्षेत्र अधिक

  • कांदा साठवणूक तंत्राचा म्हणजे कांदा चाळीचा उपयोग नाही

  • असेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ

  • रब्बी हंगामातील कांदा पावसाळ्यामध्ये (जून-ऑक्‍टोबर) सर्वोच्च भावावर विकण्याची संधी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT