Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing In Satara : सातारा जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप पूर्ण

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांची ऊस गाळप हंगामाची सांगता झाली असून, एकमेव अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांची ऊस गाळप हंगामाची (Sugarcane Crushing Season) सांगता झाली असून, एकमेव अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

जिल्ह्यातील १५ कारखान्यांकडून ९६ लाख ८८ हजार ३१० मेट्रीक टन ऊसगाळपाद्वारे ९९ लाख ९५ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३२ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

गत वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा ऊस गाळप हंगामाची सांगता लवकर झाली आहे. हंगाम सुरू होताना मोठ्या प्रमाणात ऊस असल्याचे चित्र निर्माण झाल्याने हा हंगाम लांबू शकतो तसेच आपला ऊस शिल्लक राहील अशी स्थिती निर्माण झाली होती.

मात्र जसजसा गाळप हंगाम पुढे जाईल तसतसा गाळपाची उद्दिष्टे गाठताना कसरत करावी लागणार असल्याचे कारखान्याच्या लक्षात आल्यावर कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यावर भर दिला होता. या हंगामात १५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता.

यापैकी १४ साखर कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली असून, एकमेव अजिंक्यतारा साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. रविवार अखेर या १५ कारखान्यांनी ९६ लाख ८८ हजार ३१० टन ऊसगाळपाद्वारे ९९ लाख ९५ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी १०.३२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक जरंडेश्‍वर कारखान्याने गाळप व साखर निर्मिती केली आहे. जरंडेश्‍वर कारखान्याने १६ लाख २७ हजार ३० टन उसाचे गाळपाद्वारे १६ लाख ४१ हजार ८०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

सह्याद्री साखर कारखान्यांचा सर्वाधिक १२.५९ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. जिल्ह्यात एकमेव अजिंक्यतारा साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

एक कोटी साखरनिर्मितीसाठी साडेचार हजार क्विंटल साखर निर्मितीची आवश्यकता असून, एकमेव अजिंक्यतारा साखर कारखाना सुरू आहे. हे कारखान्यांचे गाळप १० ते १२ एप्रिल अखेर सुरू राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT