Washim News : शेतकऱ्यांनी शास्त्रीय व आधुनिक दृष्टिकोनातून पिके घेण्याची आज गरज आहे. शाश्वत शेती, एकात्मिक उत्पादन प्रणाली व प्रक्रिया मूल्यवर्धन हे महत्त्वाचे झाले आहे. शेतकऱ्यांनी नव्या वाणांचे बियाणे संकलित करून खर्चात बचत करावी आणि इतर शेतकऱ्यांनाही सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत वाशीम कृषी विज्ञान केंद्रातर्फे मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी गावात ‘तेलबिया आदर्श पीक गाव प्रात्यक्षिक कार्यक्रम’ राबवला जात आहे. याअंतर्गत उन्हाळी भुईमूग पिकाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १४) उन्हाळी भुईमूग शेती दिन आणि ‘जलतारा’ जलसंधारण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ. काळे यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी गोकसावंगीच्या सरपंच वत्सलाताई बबन खुळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी प्राजक्ता कुचेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात केव्हीकेचे विषयतज्ज्ञ डॉ. एस. के. देशमुख, टी. एस. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले, कृषी सहायक रवी एकाडे, कृषीसखी सौ. खंडागळे, प्रगतिशील शेतकरी बबन खुळे व शरद खंडागळे यांची उपस्थिती लाभली. उद्घाटन सत्रात डॉ. देशमुख यांनी पीक प्रात्यक्षिक उद्दिष्ट स्पष्ट केले.
प्राजक्ता कुचेकर यांनी जलसंधारणाच्या पारंपरिक व सुधारित तंत्रांची माहिती दिली आणि ‘जलधारा अभियान’ अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांकडून जलप्रतिज्ञा घेतली. यानंतर टी. एस. देशमुख, रवी एकाडे यांनीही मार्गदर्शन केले. शरद खंडागळे यांनी भुईमूग शेतीतील अनुभव सांगितले. सूत्रसंचालन टी. एस. देशमुख यांनी केले, तर डॉ. एस. के. देशमुख यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.