Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Middday Meal : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहारात बेदाणा

Bedana Market : शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने सोमवारी (ता. १२) जारी केला.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने सोमवारी (ता. १२) जारी केला. राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पोषण आहारात बेदाणा समावेश करण्याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बेदाणा बाजारपेठेला मोठी चालना मिळणार आहे.

शालेष पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, द्राक्ष बागायतदार संघ, व्यापारी आणि विविध संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये बेदाणा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, यासदंर्भात अंमलबजावरणी झाली नव्हती. त्यामुळे आदेशाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती.

सोमवारी (ता. १२) पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पूरक आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचा आदेश प्राथमिक शिण संचालनालय यांनी काढला. २०११ पासून आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोयाबिस्किट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गूळ, शेंगदाणे, चुरमुरे दिले जातात.

याबरोबरच बेदाणाही आठवड्यातून एक दिवस देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात सुमारे दीड लाख टन बेदाण्याचे उत्पादन होते. बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याचे ब्रॅंडिग आणि विक्री करणे सोपे होईल. शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश झाल्याने बेदाण्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून बेदाण्याचा चांगला उठाव होणार आहे.

किती बेदाणा मिळणार

राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केला. पण प्रत्येक विद्यार्थ्याला किती बेदाणा मिळणार आहे. याबाबत या आदेशात स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत शालेय विभाग काय निर्णय घेणार याकडे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT