Horticulture Development Mission Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Horticultural Development : ‘फलोत्पादन विकास’अंतर्गत जुन्या बागांचे पुनरुज्जीवन योजना

Horticulture Development Scheme : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४ अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४ अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने २०२३-२४ मध्ये राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे.

जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रुपये ४० हजार प्रति हेक्टरी ग्राह्य धरून त्याच्या ५० टक्केप्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रुपये २० हजार प्रति हेक्टरप्रमाणे अनुदान देय आहे.

तसेच यामध्ये कमीतकमी ०.२० हेक्टर व कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

असे आहे फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय

आंब्यासाठी कमीतकमी वय २० वर्षे तर जास्तीत जास्त ५० वर्षे.

चिकूसाठी कमीतकमी वय २५ वर्षे तर जास्तीत जास्त ५० वर्षे.

संत्र्यासाठी कमीतकमी वय १० वर्षे तर जास्तीत जास्त २५ वर्षे.

मोसंबीसाठी कमीतकमी वय ८ वर्षे तर जास्तीत जास्त २५ वर्षे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT