Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Suicide : शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवा

Pranit Shetkari Sanghtana Protest : कांदा उत्पादक पट्ट्यात सरकारविरोधात संताप वाढू लागला आहे. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सटाणा येथे बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले.

Team Agrowon

Nashik News : गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांवर अनेक अन्यायकारक बंधने लादली जात आहेत. त्यामध्ये कांदा निर्यातबंदी करून शेतकरी आर्थिक संकटात आहे. आता शेतकऱ्यांकडे पैसा शिल्लक राहिला नसून तो दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात सरकारविरोधात संताप वाढू लागला आहे. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सटाणा येथे बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले. कांदा निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

गुरुवारी (ता. १) कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे सटाणा बाजार समितीसमोर मालेगाव-सटाणा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता शेतकरी जमले त्यांनतर दीड तास रास्ता रोको करण्यात आले. या वेळी ट्रॅक्टर व ट्रॉली रस्त्यावर आडव्या लावण्यात आल्याने वाहतूक खोळंबली होती. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादल्यामुळे सध्या कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येऊन कांदाप्रश्नी काहीही बोलले नाहीत.

उलट दौऱ्याच्या वेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. सत्ताधाऱ्यांना मतदानातून दाखवून देऊ, पंतप्रधान रामराज्य येईल, असे सांगतात. मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करतात अशी टीका या वेळी करण्यात आली.

कांद्याची निर्यातबंदी लवकर न उठवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे दिला आहे. या वेळी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांसह भास्कर सोनवणे, भास्कर बागुल, देविदास अहिरे, नयन सोनवणे, महेंद्र जाधव, भिका सूर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, यशवंत गुंजाळ, वसंत जाधव, माणिक निकम, दौलत तोताराम, प्रवीण अहिरे, सुनील वाघ, सुनील बिरारी, देविदास जाधव, वैभव अहिरे, नीलकंठ भालेराव, शेखर बागुल, गोकुळ बागुल, समाधान वाघ, विवेक सोनवणे, नितीन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT