Satara ZP Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Budget : सातारा जिल्हा परिषदेचे ४२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

Satara Zilla Parishad : प्रशासकीय राजवटीत सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेचे २०२४-२५ चे ४१ कोटी ९९ लाख रुपयांचे आणि एक लाख शिलकीचे अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले.

Team Agrowon

Satara News : प्रशासकीय राजवटीत सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेचे २०२४-२५ चे ४१ कोटी ९९ लाख रुपयांचे आणि एक लाख शिलकीचे अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल तयार करणे, एक सौर शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्ह्यात आयुर्वेद दवाखाने सुसज्ज बनवून दर्जेदार सुविधा देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अंदाजपत्रक सादर केले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कदम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संतोष हराळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. स्वनिधीचा स्रोत, मुद्रांक शुल्क, महसुली, व्याज व इतर आर्थिक वर्षासाठीचे सरासरी उत्पन्न गृहीत धरून ४१ कोटी ९९ लाख रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.

सर्व विभागांच्या विकासकामांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीमध्ये समतोल राखत निधीची तरतूद केली आहे. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करणे, कृषी विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविणे, स्वच्छ पेयजल योजना पूर्णत्वास नेणे, यासह विविध कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली.

असे आहे अंदाजपत्रक

सामान्य प्रशासन : एक कोटी ७० लाख, शिक्षण विभाग (प्राथमिक) : चार कोटी ७३ लाख, बांधकाम विभाग (उत्तर व दक्षिण) : ११ कोटी, लघुपाटबंधारे विभाग : एक कोटी, आरोग्य : दोन कोटी २५ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा : एक कोटी, कृषी विभाग : एक कोटी ८४ लाख, पशुसंवर्धन विभाग : एक कोटी, समाजकल्याण : दोन कोटी ३७ लाख, संकीर्ण : ११ कोटी ९४ लाख, महिला व बाल कल्याण विभाग : एक कोटी २० लाख, एकात्मिक बाल विकास सेवा योजना : १३ लाख ७५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT