Bribery Arrest Agrowon
ॲग्रो विशेष

Bribery Arrest : सरपंचाच्या पतीला हजार रुपयांची लाच घेताना रंगहात अटक

Sarpanch Bribe News : वडिलांच्या नावे असलेले घर बक्षीसपत्रान्वये नावावर झाले. त्या बक्षीसपत्राची ग्रामपंचायत अभिलेखावर नोंद घेऊन घराचा नमुना आठ मिळण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच पतीने तीन हजारांची लाच मागितली.

Team Agrowon

Akola News : वडिलांच्या नावे असलेले घर बक्षीसपत्रान्वये नावावर झाले. त्या बक्षीसपत्राची ग्रामपंचायत अभिलेखावर नोंद घेऊन घराचा नमुना आठ मिळण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच पतीने तीन हजारांची लाच मागितली. या प्रकरणी एक हजार रुपये स्वीकारताना सरपंचपती देवानंद जामनिक याला मूर्तिजापूर येथे अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने २६ फेब्रुवारीला लाचलुचपत विभागात तक्रार दिली, की वडिलांनी त्यांच्या नावे सालतवाडा (ता. मूर्तिजापूर) येथील विटा सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर बक्षीसपत्रान्वये तक्रारदाराच्या नावावर केले आहे. संबंधित बक्षीसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर घेऊन घराचा नमुना ८ अ मिळण्यासाठी सालतवाडा गट ग्रामपंचायतीकडे मागणी केली.

या गट ग्रामपंचायतीत महिला सरपंच सीमा देवानंद जामनिक यांचे सर्व काम त्यांचे पती गैरअर्जदार देवानंद जामनिक पाहत असल्याने तक्रारदार हे त्यांना भेटले. बक्षीसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना ८ अ देण्यास विनंती केली. त्यावर सरपंच पती देवानंद जामनिक यांनी तक्रारदाराला तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.

या तक्रारीच्या आधारे २६ फेब्रुवारीला मूर्तिजापूर येथे आंबेडकर चौकात शासकीय पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. देवानंद जामनिक यांनी तडजोडी अंति एक हजार रुपयांची लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) शासकीय पंचासमक्ष सापळा कार्यवाही करण्यात आली.

देवानंद जामनिक यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारल्याने ताब्यात घेत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सच्छिंद्र शिंदे व पोलिस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस अंमलदार डिगांबर जाधव, किशोर पवार, प्रदीप गावंडे, अभय बावस्कर, नीलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, चालक सलिम खान यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT