Mahanand Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Mahanand Dairy : 'महानंद'वरून राऊत यांची सरकारवर बोचरी टीका; म्हणाले, 'सरकारला भीक....'

Sanjay Raut On Mahanand Dairy : महानंद दूध डेअरीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, 'सरकारला भीक लागली आहे का?' असा सवाल केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Mumbai News : राज्यातली प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदचा कारभार गुजरातमधील एनडीडीबीकडे देण्यात येणार आहे. यावरून राज्यातील राजकार चांगलेच तापलेलं आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एखदा सरकारवर गुरूवारी (ता. ४ रोजी) टीका केली. 'महानंद'च्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरून त्यांनी ही टीका केली आहे.

यावेळी राऊत म्हणाले, 'महानंदचा विषय अत्यंत संवेदनशिल बनला आहे. येथील कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यापासून पगार दिलेला नाही. सरकारशी संबंधीत कर्मचाऱ्यांना चार-चार, पाच-पाच महिन्याचा पगार दिला जात नाही. उलट 'महानंद' हा गुजरात लॉबीला विकला जातोय'. 'गुजरात लॉबीचा डोळा हा महानंदच्या २७ एकर जमिनीवर असून त्यासाठी व्यवस्थापन विस्कळीत केलं जात आहे. ही जमीन गुजरात लॉबीच्या घशात घालण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांनी सौदा केला', असा आरोप राऊत यांनी केला आहे.

राजेश परजणे कोण?

त्याचबरोबर राऊत यांनी, महानंदचे चेअरमन राजेश परजणे कोण आहेत? ते कोणाचे पाहूणे? साडू? नातेवाईक? आहेत याचा खुलासा देखील करावा असे आवाहन सरकारला दिले आहे. तर परजणे यांच्या मदतीनेच २७ एकर जमिनीचा सौदा केला जातोय की नाही याचेही स्पष्टीकरण महाराष्ट्राला या सरकारने द्यावे, अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली आहे.

धारावी पासून महानंद

या राज्यातील मोक्याच्या जागा गुजरात लॉबीच्या घशाच कशा जातात? असा सवाल राऊत यांनी केला आहे. त्यांनी, 'धारावी पासून महानंदपर्यंत जमिनी कशा गुजरात लॉबीला विकल्या जातात? त्यांनाच त्या कशा मिळतात? त्यांना त्या कोण मिळवून देतोय? या मागचा सुत्रधार कोण? याचाही ताबडतोब खुलासा व्हायला हवा असे म्हटलं आहे.

सरकारला भीक

तसेच मदानंद कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना पगार दिला जात नाही यावरून देखील राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, आमदार खासदार यांना देण्यासाठी १०० कोटी रूपये आहेत. जाहिरातीवर खर्च करायला पैसे आहेत. पण कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. सरकारला भीक लागली आहे का? असे म्हटले आहे. तर महानंदा विकायला काढण्यामागे फक्त २७ एकर जमिनीचा सौदा असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT