Tembhu Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

Sangli Irrigation Project : गत वर्षी ४२.७३ टीएमसी इतके पाणी योजनेतून दुष्काळी पट्ट्यातील शेतीची तहान भागवली होती. गतहंगामाच्या तुलनेत यंदा १६.२३ टीएमसी कमी उपसा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केल्या. यंदा तिन्हीही योजनांतून २६.५० टीएमसी पाणीउपसा केला आहे. गत वर्षी ४२.७३ टीएमसी इतके पाणी योजनेतून दुष्काळी पट्ट्यातील शेतीची तहान भागवली होती. गतहंगामाच्या तुलनेत यंदा १६.२३ टीएमसी कमी उपसा झाला आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी सुमारे ४२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होतो. गत हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती होती. त्यामुळे शंभर टक्के पाणीउपसा केला होता. त्याआधी २०२२-२३ मध्ये ३२ टीएमसी पाणी उचलून दुष्काळी भागासाठी आर्वतन सोडले होते.

टेंभू योजनेवर ६० हजार, म्हैसाळ योजनेवर ६० हजार, तर ताकारी योजनेवर २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय झाली असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजना सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला वरदान ठरल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचन योजनेचे आवर्तन सुरू केले जाते.

‘ताकारी’तून ४.२२, ‘म्हैसाळ’मधून ९.७३, तर ‘टेंभू’मधून १२.५५ टीएमसी उपसा करण्यात आला. कोयना आणि वारणा दोन्ही धरणांत शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाणी उपलब्धतेमुळे सिंचन योजनांवर ताण निर्माण झाला नाही.

Irrigation Scheme

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

Totapuri Mango: तोतापुरी आंब्याला १५ हजारांचा दर

Rahul Gandhi Demands: धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Petrol Ethanol Blending: इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित

SCROLL FOR NEXT