Sangli News : जिल्ह्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून पिकांना पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीउपसा सुरू आहे. जिल्ह्यातील ८३ लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा ३७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जत तालुक्यात २७ प्रकल्पांत अवघा १८ टक्के म्हणजे ५३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जत तालुक्यासह अन्य तालुक्यांत पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पाच मध्यम व ७८ लघू प्रकल्प असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट इतकी आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरपासून शेतीला पाण्याचा वापर वाढला. त्यामुळे डिसेंबर, जानेवारीमध्ये प्रकल्पांतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासणार नसल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला होता. मात्र, दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात प्रकल्पांतील पाणीसाठा कमी झाला आहे.
जानेवारीमध्ये ६३ टक्के पाणीसाठा होता. तर फेब्रुवारीमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला. दरम्यान, गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असल्याने पाणीउपसा होऊ लागला आहे.
त्यामुळे महिन्यात ११ टक्क्यांनी साठा कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. मार्च महिन्यात ८३ प्रकल्पांत एकूण पाणीसाठा ४१९२.३४ दशलक्ष घनफूट असून २९०८.५४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. या महिन्यात ११२२ दशलक्ष घनफुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे.
जत तालुक्यात अवघा १८ टक्के साठा
जत तालुक्यात २७ प्रकल्पांची संख्या आहे. या प्रकल्पांची ३६२८.४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. तालुक्यातील दोन प्रकल्प कोरडे तर, सात प्रकल्पांत मृतपाणीसाठा आहे. ११ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)
तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
तासगाव ७ २५९.१० ४६
खानापूर ८ ३०४.२९ ५५
कडेगाव ७ २८७.०१ ४५
शिराळा ५ ३९९.१२ ४५
आटपाडी १३ ६३३.३६ ५५
जत २७ ५३०.२८ १८
कवठे महांकाळ ११ ४१६.५६ ५०
मिरज ३ ६७.११ ५६
वाळवा २ १२.६९ २६
एकूण ८३ २९०८.५४ ३७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.