Sugarcane Rate FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate FRP : दत्त इंडियाला राजू शेट्टींची मागणी मान्य, जिल्ह्यातील १५ कारखान्यांची भूमिका गुलदस्त्यात

Sangli : दत्त इंडिया साखर कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य केले.

sandeep Shirguppe

Sangli Sugarcane Rate : सांगलीमधील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे सोमवार (ता. ११) रात्री अकरा वाजता मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या ३६ तासांपासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागे घेतले आहे.

मात्र, जिल्ह्यातील १५ कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये आणि गत हंगामातील ५० व १०० रुपये थकीत देणे द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रविवार (ता. १०) सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याच्या गेटवर आंदोलन सुरु केले. आंदोलन सुरु झाल्यावर बैठकाही झाल्या मात्र, त्या बैठका निष्फळ ठरल्या. त्यामुळे संघटना आक्रमक झाली.

सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. त्यातही तोडगा निघाला नसल्याने निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आनंदोलन सुरुच ठेवले. त्यानंतर रात्री दहा नंतर दत्त इंडिया प्रशासनाने दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडियाकडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरून स्वाभिमानीच्या मागणी पेक्षा अधिक दर देण्याचं मान्य करत असल्याचं लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले.

यामुळे राजू शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील इतर उर्वरित १५ कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील,असे स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT