Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सांगली जिल्ह्यात दहा दिवसांत १२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद

Rain Forecast : सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात आज अखेर १२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात आज अखेर १२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नदी, ओढे आणि नाले दुथडी वाहू लागले आहेत. तर शिराळा तालुक्यातील उत्तर भागात ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतीचे बांध फुटले आहेत. पूर्वमोसमी पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला येत्या आठवड्यापासून गती येणार आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पूर्व मोसमी पावसाने सुरुवात केली. एक जून ते १० जून या दहा दिवसांत ६ दिवस पाऊस झाला. बहुतांश भागात हलका पाऊस झाला. तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. यामुळे या भागातील अग्रणी नदी, भोर नदी, तलावातील पाणीसाठा वाढला आहे.

जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा आणि कडेगाव या तालुक्यांतही दमदार पाऊस झाला. जमिनीच्या ताली पाण्याने भरल्या आहेत. उसाच्या सरींमध्ये पाणी साचले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सिमेंट बंधारे पाण्याने भरले आहेत. शेतात पाणी साचले आहे.

शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे, घागरेवाडी, गिरजवडे, शिवरवाडी, भैरववाडी परिसरात शनिवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे बांध फुटून व माती वाहून जाऊन गाळ साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धूळवाफ पेरणी केलेल्या व भात उगवून आलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने धूळवाफ पेरणी झालेल्या शेतातील बांध आणि ताली तुटल्या असून काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गाळ साचला आहे. त्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुरुस्ती व बियाणांसाठी खर्च येणार असल्याने आम्हाला झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी करू लागले आहेत.रविवारपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधून मधून हलका पाऊस पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT