Sangli Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात अद्यापही ऊस दराचा तोडगा नाहीच, विश्वजीत कदम यांची मध्यस्थी

Vishwajit Kadam : सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ३१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला.

sandeep Shirguppe

Sugarcane FRP Rate : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावरून मागच्या २ महिन्यांपासून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न मिटला असला तरी सांगली जिल्ह्यात अद्यापही तोडगा न निघाल्याने साखर कारखान्यांचे धुराडे बंदच आहेत.

दरम्यान ३ हजार १०० वर तोडगा निघण्याची शक्यता आहे. याबाबत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात अंतीम टप्प्यात बोलणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मागच्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांसोबत ऊस दराबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ३१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांनी घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही तोडगा हवा, अशी मागणी केली.

कडेगाव येथे रविवारी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली.

या बैठकीस खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारू, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित होते.

ज्या साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ९०० पेक्षा जादा दर अदा केलेला आहे. त्यांनी प्रति टन ५० रुपये व २ हजार ९०० पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफआरपीपेक्षा किमान रुपये १०० रुपये जादा अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल द्यावा.

शासन स्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, तसेच चालू गळीत हंगामात ३१०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

स्वाभिमानी'कडून कोल्हापूर पॅटर्नची मागणी

कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विश्वजित कदम यांची भेट घेतली. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊसदर जाहीर करावा. तसेच मागील वर्षी तीन हजारपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये जादा अदा करावे व तीन हजारपेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये जादा अदा करावे, अशी मागणी खराडे व राजोबा यांनी कदम यांच्याकडे केली.

राजू शेट्टींशी चर्चा करणार

कारखानदारांच्या वतीने आमदार विश्वजित कदम हे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारच्या बैठकीतील निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमान्य आहे. यावर कदम यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदार व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT