Sugarcane News agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane News : सांगली जिल्ह्याने साखर गाळपात घेतला वेग, ऊसदर घोषणेची मात्र प्रतिक्षा

Sugar Crushing Sangli : सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला वेग आला आहे. २५ दिवसांत १५ लाख ६८ हजार २५४ टन उसाचे गाळप झाले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane News : सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला वेग आला आहे. २५ दिवसांत १५ लाख ६८ हजार २५४ टन उसाचे गाळप झाले आहे. तर १४ लाख ४६ हजार ८१९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने साखर उतारा वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखान्यांत चढाओढ सुरू आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील एक-दोन साखर कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची घोषणाच केलेली नाही.

हंगामाच्या सुरवातीलाच झालेला पाऊस, विधानसभा निवडणुकांमुळे उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम आता हळूहळू वेग पकडू लागला आहे. रस्त्यालगत असणाऱ्या फडावर सुरवातीला कोयता पडत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांनी पहिला हप्ता ३ हजार ७०० रुपयांचा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर सर्व कारखानदारांनी मौन बाळगले आहे. काही साखर कारखानदारांनी ३ हजार २०० रूपयांपर्यंत घोषणा केल्या आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा दर मान्य नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

हंगामाच्या सुरवातीला कारखान्यांनी अधिकाधिक गाळपावर भर दिला आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने गाळपात आघाडी घेतली आहे. क्रांती साखर कारखान्याने दोन लाख १६ हजार ४५० टन गाळप केले आहे. साखर उताऱ्यात हुतात्मा साखर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

सांगलीतील कारखानदार ३ हजारवर अडकले

सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदार ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपयांवर येऊन थांबले आहेत. साखर कारखानदारांना को-जनरेशन, इथेनॉल, मद्यनिर्मिती या उपपदार्थामधून जादा पैसा मिळत असतो. परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधीत शेतकरी संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या थंडीचा जोर वाढत असल्याने साखर उताराही हळूहळू वाढत आहे. फडातून उसाने भरलेली गाडी ओढून बाहेर काढण्यासाठी ऊस उत्पादकाला प्रतिगाडी दीडशे ते दोनशे रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. इथेच शेतकऱ्यांला प्रतिटन १०० रुपयांचा घाटा बसत आहे.

राजारामबापू व दत्त इंडिया या साखर कारखान्यांनी अनुक्रमे ३ हजार २०० ते ३ हजार १५० अशी दराची घोषणा केली आहे. हुतात्या, क्रांती, सोनहिरा, विश्वास कारखान्यांनी अद्याप पहिल्या हप्त्याची घोषणा केलेली नाही. यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे डोळे दराकडे लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana in Polyhouse: पॉलिहाऊसमध्ये केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते का?

Jaltara Project: जलतारा उभारणीसाठी विशेष मोहीमॲग्रोवन वृत्तसेवा

Soybean Procurement: बारा लाख टन सोयाबीन खरेदीचे आव्हान

Maharashtra ZP Election Voting: ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, कुठे किती मतदान?

Radhakrishna Vikhe Patil: आधुनिक तंत्रज्ञानातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल : विखे पाटील

SCROLL FOR NEXT