Sand Excavation Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Mafia : वाळूमाफियांना दणका: ३० जणांची पोलिस स्टेशनमध्ये ओळख परेड

Illegal Sand Excavation : जिल्ह्यात अधिकृत वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढले आहे.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुडगूस घातला आहे. परिणामी पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, गुरुवारी (ता. २७) पोलिस अधीक्षक कार्यालयात वाळूमाफियांची ओळख परेड घेण्यात आली. जालना आणि भोकरदन विभागातील ३० वाळूमाफियांकडून बंधपत्र घेण्यात आले.

जिल्ह्यात अधिकृत वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढले आहे. वाळू माफियांकडून २० ते २२ हजारांपर्यंत प्रति टिप्परने विक्री केली जात आहे. शिवाय गोदावरीची वाळू ही ३० ते ३५ हजारांपर्यंत टिप्परने विक्री होत असल्याचे चित्र आहे.

या अवैध वाळू वाहतुकीमुळे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर घनसावंगी तालुक्यातील दैठणा ब्रु. येथे महसूलच्या पथकावर काही दिवसांपूर्वी वाळूमाफियांनी हल्ला केला होता.

त्यामुळे पोलिसांसह महसूल प्रशासनावर अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात लोकप्रतिनिधींकडूनही टीका केली जात आहे. या घटनांमुळे अवैध वाळूमाफियांना लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. वाळूमाफियांच्या परेडनंतर तरी अवैध वाळू वाहतुकीला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे.

पोलिसांसमोर रांगेत उभे

अवैध वाळूचे टिप्पर, ट्रॅक्टर दामटणारे पोलिस रेकॉर्डवरील वाळूमाफिया पोलिस अधीक्षक कार्यालयात ओळख परेडसाठी आल्यानंतर रांगेत उभे होते. शिवाय हाताची घडी घालून शिस्तीत उभे राहिल्याचे चित्रही पाहण्यास मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT