Wrestlers Protest agrowon
ॲग्रो विशेष

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी निदर्शने करणार

दिल्लीतील जंतर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ देशभरात निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली.

Team Agrowon

SKM supports wrestlers Protest : लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काही दिवसांपासून कुस्तीपटूंचे ((Wrestlers) ) दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आता संयुक्त किसान मोर्चाने (sanyukt kisan morcha) पाठिंबा दिला असून त्यांच्या समर्थनार्थ दिल्लीसह देशव्यापी निदर्शने करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रविवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरक्षा वाढवण्यात आली.

गेल्यावर्षी दिल्लीत झालेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले होते. आता हे कायदे केंद्र सरकारने रद्द केले आहेत.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी. तसेच त्यांची पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर १५ दिवसांपासून निदर्शने करत आहेत.

शनिवारी SKM च्या निवेदनानुसार, 7 मे रोजी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील संघटनेचे अनेक नेते जंतरमंतर येथील आंदोलनस्थळाला भेट देऊन कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. त्यापूर्वी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी जंतरमंतरजवळ आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. एएनआयशी बोलताना अनिल विज यांनी म्हणाले की, आमचा कुस्तीपटूंच्या आंदोलनास पाठिंबा आहे.

आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मल्लिक यांनी जानेवारी महिन्यामध्ये रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकरे यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापन केली होती. बुधवारी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी जंतरमंतर येथे आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली.

दरम्यान, कुस्तीपटूंनी 23 एप्रिल पासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आणि ब्रिज भूषण सिंग यांना डब्ल्यूएफआय प्रमुख पदावरून हटवून तुरुंगात टाकले जात नाही तोपर्यंत ते हलणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनास देशभरातील विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT