SKM Protest Agrowon
ॲग्रो विशेष

SKM Protest : संयुक्त किसान मोर्चानं केली आंदोलनाची घोषणा; पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांना निवेदन

संयुक्त किसान मोर्चा मागण्यांचे निवेदन सर्व खासदारांना लवकरच पाठवणार आहे. मोर्चाचं शिष्टमंडळ १६, १७ आणि १८ जुलै रोजी खासदारांना प्रत्यक्ष भेटणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्यांसाठी एनडीए सरकारवर दबाव आणण्याची विनंती करणार आहे.

Dhananjay Sanap

संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्याची निर्णय जाहीर केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीत २०२०-२१ मध्ये तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी हमीभाव कायद्यासह कर्जमाफीची मागणी केली होती. परंतु अद्यापही त्यावर केंद्र सरकारने पावलं उचलली नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाकडून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चा गुरुवारी (ता.११) विविध मागण्यांचं पंतप्रधान आणि लोकसभा विरोधी पक्ष नेत्यांना निवेदन दिलं. संयुक्त किसान मोर्चाने सर्वसाधारण सभेनंतर आंदोलनाची घोषणा केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, " ९ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय कृषी विभागाच्या सचिवांनी स्वाक्षरी केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे." असं संयुक्त किसान सभेने स्पष्ट केलं. संयुक्त किसान मोर्चा मागण्यांचे निवेदन सर्व खासदारांना लवकरच पाठवणार आहे. मोर्चाचं शिष्टमंडळ १६, १७ आणि १८ जुलै रोजी खासदारांना प्रत्यक्ष भेटणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्यांसाठी एनडीए सरकारवर दबाव आणण्याची विनंती करणार आहे.

तसेच ९ ऑगस्ट रोजी देशभरातील मागण्यासाठी निदर्शने करणार आहे. तसेच 'भारत छोडो दिवस' 'कॉर्पोरेटस भारत छोडो दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असं संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केलं आहे.

संयुक्त किसान मोर्चाने २०२१ साली तीन कृषी कायद्याच्या विरोधात दंड थोपटून केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावले होते. दरम्यान, १३ फेब्रुवारी २०२४ पासून संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन पुकारलं आहे. परंतु हरियाणा सरकारने आंदोलकांना हरियाणा-पंजाबच्या सीमेवर रोखलं आहे. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणूका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT