Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed Selling : खामगांवात जादा दराने सोयाबीन बियाणे विक्री

Kharif Seoson : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून, बियाणे विक्री सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रकार होत आहेत.

Team Agrowon

Buldana News : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून, बियाणे विक्री सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात खामगावमध्ये सोयाबीन बॅग जादा दराने विक्रीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कृषी विभाग काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.

हंगाम सुरू झाल्यानंतर बियाणे विक्री सुरू झाली. पण विक्रेते किमतीपेक्षा अधिक दराने विकत आहेत. बाजारपेठेत ठरावीक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे. खामगाव येथील एका कृषी केंद्रात जास्त भाव आकारत सोयाबीन विकत आहे. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तपासणी करण्यात आली.

खामगाव शहरातील सरकी लाइन भागातील या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार बुधवारी (ता. ३१) उजेडात आला होता. बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिबॅग ३६०० रुपयांऐवजी ४२०० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. प्रति बॅग ६०० रुपये अतिरिक्त आकारले होते. दोन बॅग सोयाबीनसाठी १२०० रुपये जादा घेतले होते.

या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रावर धडक दिली. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना पाहता कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पिंटू लोखडकार (रा. नागापूर) यांच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. तथ्य आढळून आल्याने संबंधित कृषी केंद्र आणि गोदामातील बियाणांच्या साठ्याची मोजणी पथकाने केली.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत गुरुवारी (ता. एक) बुलडाणा येथे सुनावणी ठेवण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT