Onion and Chana Dal Agrowon
ॲग्रो विशेष

Onion, Chana Dal Sale : दिव्यात स्वस्त दरात कांदा, चणाडाळ विक्री

Sale on Cheap Price : दिव्यात भाजपकडून ग्राहकांसाठी स्वस्त दरात कांदा व चणाडाळ विक्री करण्यात आली.

Team Agrowon

Diva News : राज्यात कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. दिव्यातील बाजारपेठेत ६० ते ७० किलो रुपयांनी कांदा विकला जात आहे. कांद्याच्य दराने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिव्यात भाजपकडून ग्राहकांसाठी स्वस्त दरात कांदा व चणाडाळ विक्री करण्यात आली.

अनेक जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा, टोमॅटो आणि डाळींच्या किमतीत सुधारणा झाली आहे. या दराचा शेतकऱ्यांना दिसाला मिळाला असला तरी सामान्यांना त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे.

त्यामुळे केंद्र सरकारकडून ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात कांदा, चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवा भाजपकडून गृहिंणींसाठी स्वस्त दरात कांदा, चणाडाळ देण्यात आली.

दिव्यातील एन. आर. नगर येथे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ठाणे युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर आणि भाजपा दिवा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या हस्ते महिलांना ४ किलो कांदा शंभर रुपयात; तर १ किलो चणाडाळ साठ रुपयांत देण्यात आली.

ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर, ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतिश केळशीकर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, दिवा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत, भाजप सदस्या मीनाक्षी केळशीकर, समिता घाग, वैशाली शेलार, सुषमा देवरूखकर, सचिन भेरे, संजय सिंग, तुषार गायकर, कमलेश पाटील, नवनाथ देशमुख, मयूर जाधव, रिना देशमुख आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT