Cotton Seed Selling Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Selling : आजपासून कपाशी बियाण्याच्या विक्रीस सुरुवात

Cotton Seed Update : परभणी-हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता. ३०) पर्यंत बी. टी. कपाशी बियाण्याची सुमारे ६ लाख पाकिटे तसेच सोयाबीनच्या ८३ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

Team Agrowon

Parbhani Cotton News : परभणी-हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता. ३०) पर्यंत बी. टी. कपाशी बियाण्याची सुमारे ६ लाख पाकिटे तसेच सोयाबीनच्या ८३ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. कपाशीच्या बियाण्याच्या विक्रीस गुरुवारी (ता. १) सुरवात होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरिपात १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे. त्यानुसार बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे विविध वाणांच्या १० लाख ७२ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आलेली आहे.

बियाणे कंपन्यांनी पुरवठा सुरु केला असून मंगळवार (ता. ३०) पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ५० हजारांवर बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत. यंदा सोयाबीनची २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी १ लाख ८७ हजार ५०० क्विंटल बियाण्याची गरज आहे.

ग्रामबिजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांचे घरचे मिळून १ लाख २१ हजार ८७५ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. उर्वरित ६५ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

त्यात महाबीजकडे २० हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार क्विंटल, खासगी कंपन्याकडील ४० हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

खासगी कंपन्याकडील ईगल कंपनीचे २० हजार क्विंटल, महागुजरात कंपनीकडे ५ हजार ५०० क्विंटल, यशोदा कंपनीकडे ६ हजार ५०० क्विंटल, बसंत अॅग्रोकडे ४ हजार क्विंटल, ग्रीन गोल्ड कडे १० हजार ५०० क्विंटल, अंकुर कंपनीकडे ४ हजार ५०० क्विंटल, इतर कंपन्यांकडे ३ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंगळवार (ता. ३०) पर्यंत सोयाबीनच्या २४ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला, असे मोहीम अधिकारी शंकर बलशेटवार यांनी सांगितले.

हिंगोलीत यंदा कपाशीची ३२ हजार १५९ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे.त्यानुसार बीटी कपाशी बियाण्याच्या १ लाख ६० हजार ७९३ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

खासगी कंपन्यांनी मंगळवार (ता. ३०) पर्यंत ४१ हजार ८९५ पाकिटांचा पुरवठा केला आहे. गुरुवार (ता. १) पासून बियाणे विक्री सुरु होईल. जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर आहे. त्यानुसार १ लाख ९१ हजार २५० क्विंटल बियाणे लागणार आहे.

ग्रामबिजोत्पादनातून उपलब्ध बियाणे वगळून उर्वरित ६६ हजार ९३७ क्विंटल बियाण्याची मागणी कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

त्यापैकी ५९ हजार ८१८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यापैकी ४ हजार ९४८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT