Election Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election : बाजार समिती निवडणुकीकरता पहिल्याच दिवशी २४९ अर्जांची विक्री

छत्रपती संभाजीनगर, लासुर स्टेशन, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, गंगापूर या बाजारसमितीसाठी २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) होऊ घातलेल्या निवडणुकीकरता अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २७) २४९ अर्जांची विक्री झाली होती. ३ एप्रिलपर्यंत अर्ज विक्री सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, लासुर स्टेशन, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, गंगापूर या बाजारसमितीसाठी २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या बाजार समिती निवडणुकांसाठी सोमवारी पहिल्याच दिवशी २४९ अर्जांची विक्री झाली होती.

यामध्ये सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी हमाल मापाडी, या मतदार संघासाठी विक्री झालेल्या अर्जांचा समावेश होता. गंगापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी पहिल्याच दिवशी ६५ अर्ज विक्री झाले.

पैठण बाजार समितीतून १२ अर्ज पहिल्या दिवशी विक्री झाले होते. छत्रपती संभाजी नगर बाजार समितीसाठी इच्छुकांनी ४८ उमेदवारी अर्ज घेतले होते. लासुर स्टेशन बाजार समितीसाठी २३, वैजापूर बाजार समितीसाठी ५२, कन्नड बाजार समितीसाठी ४९ अर्ज विक्री झाली.

३ एप्रिलपर्यंत अर्ज विक्री होणार असल्याने ही संख्या वाढणार स्पष्ट आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बाजार समितीसाठी जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, गंगापूरसाठी डी. आर. मातेरे, फुलंब्री विष्णू रोडगे, पैठण अनिल पुरी, लासुर स्टेशन किरण चौधरी, वैजापूर विनायक धोटे तर कन्नड बाजार समितीसाठी अर्चना वाडेकर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

SCROLL FOR NEXT