Atma Agrowon
ॲग्रो विशेष

Atma Yojana : ‘आत्मा’कर्मचाऱ्यांची मानधनवाढ प्रलंबित

ATMA Scheme: राज्यातील ५०० पेक्षा अधिक ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. नवीन कृषिमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यात ‘आत्मा’ योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सध्या अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जात आहे. ते वाढविण्याबाबत ठरविले गेले. कृषी आयुक्तांनी मार्च २०२३ मध्ये याबाबत पत्र लिहून शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. मात्र, अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील ५०० पेक्षा अधिक ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. नवीन कृषिमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

राज्यात कृषी विभागाच्या सोबतीने आत्मा विभाग काम करीत आहे. यामध्ये १४३८ पदे मंजूर असली तरी शासनाने केवळ ५२३ पदे भरली आहेत. रिक्त पदांचा अनुशेष सुमारे ६३ टक्के आहे. उपलब्ध मनुष्यबळाकडून कारभार चालवला जात आहे. सध्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाला ३० हजार, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाला २५ हजार आणि संगणक आज्ञावली रूपरेषक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला १६ हजार रुपये एवढे मानधन दिले जाते. २०१० पासून यापैकी अनेक कर्मचारी सेवारत आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता सध्याचे मानधन कमी आहे.

मानधन वाढीसाठी या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सातत्याने शासनाकडे पाठपुरावाही केला. त्याची दखल घेत कृषी, महसूल मंत्र्यांनी बैठक घेत मानधन सुधारणेबाबत काही सूचना केल्या होत्या. देशात इतर राज्यात मानधनाचे काय स्वरूप आहे, याचा अभ्यास करण्याबाबत सुचवले होते. त्यानंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून मानधनाची माहिती मागविण्यात आली. यात आंध्र प्रदेशाची माहिती मिळाली. तेथे केंद्राने ठरवून दिलेल्या अधिकतम मर्यादेपेक्षा अधिक मानधन दिले जात आहे. तेथे बीटीएमला ४२५००, एटीएम ३१३००, तर संगणक रूपरेषकाला २८,८०० रुपये मानधन मिळते.

‘आत्मा’मध्ये कार्यरत बीटीएम, एटीएम, संगणक प्रोग्रॅमर हे २०१० पासून काम करीत आहेत. त्यांचे मानधन २०२० मध्ये कमी करण्यात आले. याविरुद्ध संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा २९ एप्रिल २०२२ ला निकालही लागला. न्यायालयाने सरकारला सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांकडेही सातत्याने पाठपुरावा केला. परंतु अद्याप वेतन वाढलेले नाही. शासनाने जे वेतन कमी केले ते तरी पूर्ववत करावे.
-विनोद रहांगडाले, अध्यक्ष, आत्मा एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT