Sugarcane Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : भाऊराव कारखान्यावर युवक काँग्रेसचा रुमणे मोर्चा

Sugarcane Farmers Issue : येतो. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना मागील काही वर्षापासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात उसाचा पूर्ण एफआरपी दिली जात नाही, उसाची साखर रिकव्हरी कमी दाखविली जाते.

Team Agrowon

Nanded News : माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण संस्थापक अध्यक्ष असलेल्या देगाव-येळेगाव (ता. अर्धापूर) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर युवक काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २६) रुमणे मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी साखर कारखाना असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना राज्याचे माजी मुख्यमंंंंत्री अशोक चव्हाण यांच्या अखत्यारित येतो. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना मागील काही वर्षापासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात उसाचा पूर्ण एफआरपी दिली जात नाही, उसाची साखर रिकव्हरी कमी दाखविली जाते.

उसाचे वजन योग्य केले जात नाही आदी तक्रारी या भागातील शेतकरी करीत होते. या विरोधात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रुमणे मोर्चा काढण्यात आला.

उसाला प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये भाव देण्यात यावा, ऊस लागवडीपासून १४ महिन्यांत तोड करण्यात यावी, उसाचे पैसे पंधरा दिवसात देण्यात यावे, ऊस गाळपाला कारखान्यात जाण्यापूर्वी उसाचे वजन कुठेही करण्याची परवानगी देण्यात यावी, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

या रुमणे मोर्चात बाबूराव कदम कोंढेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, मुदखेड तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, बाळासाहेब पाटील रावणगावकर, रवींद्र डाढळे, संग्राम देशमुख, संतोष कपाटे, दादाराव पुयड, मारोतराव तिडके, कैलास गोडसे, लक्ष्मण देवणे, निरंजन पावडे, मुजीब पठाण, ज्ञानेश्वर मगरे, प्रशांत मुंगल, विलास कल्याणे, संदीप गौड, माधव गाडे, बालाजी जांगीलवाड यांच्यासह मोर्चात कारखाना परिसरातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

Water Scarcity: उभी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Orange Orchard Management: फळधारणा अवस्थेतील संत्रा बागांचे व्यवस्थापन

El Nino Impact: 'एल निनो'चा धोका; ४३ लाख टन कडधान्यांचा बफर साठा

SCROLL FOR NEXT