Tribal Development Corporation Agrowon
ॲग्रो विशेष

Gunny Bag Supply Scam: धान खरेदीत बारदाना पुरवठ्यात २५ लाखांचा गैरव्यवहार उघड!

Tribal Development Corporation Corruption: आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना बारदाना पुरविण्याच्या योजनेत २५ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शहापूर प्रादेशिक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना बारदाना पुरविण्याच्या योजनेत २५ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शहापूर प्रादेशिक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपप्रादेशिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी नोटिसा बजावल्या आहे.

धान खरेदी करताना संबंधित शेतकऱ्यांना महामंडळाकडून बारदाना दिला जातो. कोरोनात महामंडळाकडे बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी थांबू नये म्हणून शेतकऱ्यांकडूनच बारदाना खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. हे बारदाना २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना परत करण्यात आले. तरीदेखील शहापूर उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत किन्हवली केंद्रांकडून बारदाना न मिळाल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या.

तक्रारींच्या अनुषंगाने शहानिशा केल्यानंतर शहापूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या सहा केंद्रांवर ठरवून देण्यात आलेले बारदाना आणि तपासणीमध्ये आढळून आलेले बारदाना यांच्यात साधारण अडीच लाख बारदानाची तफावत आढळली. यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक यांनी चौकशी समिती स्थापन केली.

संशयित प्रतवारीकार समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये समावेश असलेल्या शासकीय व्यक्तींना देखील नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांची देखील ठाणे ग्रामीण पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींनंतर चौकशी केली. त्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर महामंडळामार्फत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी काही संशयितांचा समावेश असल्याचे दिसून येते. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येईल.
लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक-आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT