Agricultural Mechanization Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वितरित

Approval of Disbursement of Funds : राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षातील राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी वितरणास गुरुवारी (ता.२७) मान्यता दिली आहे.

Roshan Talape

Pune News : राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षातील राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी वितरणास गुरुवारी (ता.२७) मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. ज्यामुळे शेतीत कार्यक्षमता वाढवण्यास आणि उत्पादनात सुधारणा करण्यास मदत होईल.

या योजनेंतर्गत, ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प आणि अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख २५ हजार रुपयांपैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी हे अनुदान ट्रॅक्टर किंमतीच्या ४० टक्के किंवा १ लाख रुपये या दोन्ही रकमेपैकी कमी रक्कम असेल तेच अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, यंत्रसामग्री खरेदीत मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवरून करण्यात येणार आहे. तसेच, या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट वितरित केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा अनुदानाचा लाभ सहज आणि सुरक्षितपणे मिळणार आहे.

या योजनेंतर्गत २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १५० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी संचालकांनी निधी वितरणाची पत्राद्वारे विनंती केली होती. यानुसार सरकारने २७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी वितरित केला आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री, कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे, ज्यामुळे शेतीची कामे अधिक सुलभ, प्रभावी होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT