Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘पूर्णा’तून रब्बी, उन्हाळी हंगामांत आवर्तने

Rabi Season : पूर्णा प्रकल्पाअंतर्गत येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याद्वारे यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात ४ पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Hingoli News : पूर्णा प्रकल्पाअंतर्गत येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याद्वारे यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात ४ पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी आवर्तनाचे वेळापत्रक (२५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२५) जाहीर करण्यात आले. सोमवारपासून (ता. २५) पहिले आवर्तन सुरू करण्यात आले.

कालव्याचे पाणी सिंचनासाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांना शाखा कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावे लागतील, अशी माहिती वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार यांनी दिली.

पूर्णा प्रकल्पाअंतर्गत येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याचे लाभक्षेत्र हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी ४ पाणी आवर्तन नियोजन आहे. हिंगोली जिल्ह्यात २२ हजार ६५८ हेक्टर, परभणी जिल्ह्यात १६ हजार १४२ हेक्टर सिंचन क्षमता आहे.

रब्बी हंगामातील पिके, दुहंगामी तसेच हंगामातील इतर उभी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, उपसा, नदी नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास अर्ज नमुना क्रमांक ७,७-अ मध्ये भरून १० डिसेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रसाह सादर करावेत. शर्तीचे व अटीचे अधीन राहून पाणी मागणी अर्जांना मंजुरी दिली जाईल.

रब्बीतील प्रत्येक आवर्तन हे २४ दिवस चालू राहील. आवर्तनामध्ये प्रथम सिंचनासाठी वसमत शाखा व हट्टा शाखा कालवा हे १२ दिवस चालू राहतील. त्यानंतर लासीना शाखा कालवा आणि अंतिम शाखा कालवा १२ दिवस चालू राहतील.

पाऊस, आकस्मिक घटनांमुळे आवर्तन तारखेत बदल होऊ शकतो. उन्हाळी हंगामातील ४ आवर्तने मार्च, एप्रिल, मेमध्ये आवर्तने सोडण्यात येतील. त्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे बिराजदार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT