Farmer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Company : विभागीय कृषी सहसंचालकांकडून शेतकरी कंपनीचा आढावा

शेतमाल खरेदी, बीजोत्पादन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांत कंपनीचा सक्रिय सहभाग राहत असून श्री. मुळे यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतली.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील जानेफळ (ता. मेहकर) येथे कार्यरत असलेल्या विदर्भ समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीच्या (Farmers Producers Company) मुख्यालयाला विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी, कंपनीचे अध्यक्ष संतोष साखरे, उपाध्यक्ष मोहन प्र. धोटे, सचिव अमोल माडोकर, संचालक मोहन जि. धोटे, गजानन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही शेतकरी उत्पादक कंपनी विदर्भात अग्रेसर मानली जाते. गेल्यावर्षी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याहस्ते महाएफपीसीच्या सर्वसाधारण सभेत कंपनीचा सन्मान करण्यात आला आहे.

शेतमाल खरेदी, बीजोत्पादन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांत कंपनीचा सक्रिय सहभाग राहत असून श्री. मुळे यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतली.

कंपनीने उभारलेल्या गोदाम, प्रक्रिया यंत्रांची पाहणी करीत येत्या काळात कृषी विभागाच्या मदतीने आणखी काय सुविधा शेतकऱ्यांसाठी तयार करता येऊ शकतात याबाबत मार्गदर्शनही केले.

उपविभागीय कृषी अधिकारी ए. के. मिसाळ, तालुका कृषी अधिकारी के. एस. काळे, लोणार तालुका कृषी अधिकारी व्‍ही. पी. सरोदे, मंडळ कृषी अधिकारी पी. एन. गाडेकर, कृषी पर्यवेक्षक डी. जी. वायाळ, कृषी सहायक डी. ए. जाधव, पी. एस. अंभोरे, आर. डी. झोरे, पी. एस. देवकर, जी. ए. चव्हाण, डी. एल. देशमुख यांचीही यावेळी उपस्‍थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT