Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest : महसूल सहायक लाच घेताना रंगेहात पकडला

Bribery News : तालुक्यात शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री दोनच्या सुमारास सिल्लोड तहसील कार्यालयाच्या महसूल सहायकास २० हजार रुपयांची लाच घेताना भराडी (ता. सिल्लोड) परिसरातील एका पेट्रोलपंपावर रंगेहाथ पकडण्यात आले.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : तालुक्यात शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री दोनच्या सुमारास सिल्लोड तहसील कार्यालयाच्या महसूल सहायकास २० हजार रुपयांची लाच घेताना भराडी (ता. सिल्लोड) परिसरातील एका पेट्रोलपंपावर रंगेहाथ पकडण्यात आले.

अवैधरित्या होत असलेल्या वाळू वाहतुकीला लगाम बसण्याऐवजी वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी वसुली करणारे महसूलचे कर्मचारी मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडत असल्याने, महसूल विभागाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे तालुक्यात बघावयास मिळत आहे.

घटनेची माहिती अशी, की तालुक्यातील उपळी येथील लगतच्या नदीपात्रातून ट्रॅक्टर क्रमांक एमएच.२० इवाय १४९२ द्वारे अवैधरित्या वाळू काढून त्याची वाहतूक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गौण खनीज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या पथकातील महसूल सहायक शरद पाटिल याने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पथकाने सापळा रचला तर तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेताना तहसीलचा महसूल सहायक शरद दयाराम पाटील (रा. बजरंग चौक, एन-६, छत्रपती संभाजीनगर) याला मध्यरात्री दोनच्या सुमारास भराडी येथील एका पेट्रोलपंपावर रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी (ता. २५) संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक केशव दिंडे करित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT