Voting Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Voting : मतदानापूर्वीच्या ४८ तासांसाठी निर्बंध जारी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच मतदार संघांमध्ये बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे.

Team Agrowon

Akola News : विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच मतदार संघांमध्ये बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात सोमवार (ता. १८) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला आहे.

या कालावधीत बेकायदेशीर जमाव एकत्र गोळा करण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. मतदान पथके मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पुर्णपणे निर्बंध राहतील. राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदार अनुक्रमांक, केंद्र आदी अनौपचारिक ओळखचिट्ठ्या केवळ पांढ-या कागदावर मतदारांना देता येतील. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असता कामा नये.

मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत असे चिठ्ठीवाटप करता येणार नाही.निवडणूक कर्तव्यावरील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त केवळ निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. इतरांना प्रवेशावर बंदी आहे. मतदारांना लाच देणे, गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे, तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील.

मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहन वापरणे हा अपराध आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, कार, ट्रक, रिक्षा, मिनीबस, व्हॅन, स्कूटर आदींना बंदी राहील. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राच्या परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्याचे प्रदर्शन करता येणार नाही.

ज्या व्यक्तीला सरकारी सुरक्षा देण्यात आली आहे, अशा व्यक्तीच्या सुरक्षा कर्मचा-यांना केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही. सरकारी किंवा खासगी सुरक्षारक्षक असलेल्या व्यक्तीला निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी आहे.

...यावर नाही बंदी

निवडणूक प्रचार सोमवारी बंद होणार असला तरीही घरोघर (डोअर टू डोअर) प्रचारावर निर्बंध नाही. मात्र पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. रुग्णालयाची वाहने, रुग्णवाहिका, दूधगाड्या, पाणीपुरवठा वाहने, अग्निशमन बंब, पोलिस, वीज, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर बंदी नाही.

विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्यांवर बंदी नाही. रेल्वे स्थानक, बस स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांवर बंदी नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वैयक्तिक वाहनास किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांगांसाठी नेमून दिलेल्या वाहनास बंदी नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

Rain Update : सिंधुदुर्गात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Ethanol Pump Station : महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार

Indian Agriculture : ‘वाघबारसे’च्या निमित्ताने शेतकऱ्यांची निसर्गाला प्रार्थना

SCROLL FOR NEXT