Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Rate : गायीचा दूध खरेदी दर पूर्ववत करा, अन्यथा पुरवठा रोखू ; अरुण डोंगळेंना इशारा

Gokul Dairy : गायीच्या दुधाचा खरेदी दर पूर्ववत करावा अन्यथा गोकुळचा दूध पुरवठा रोखू असा इशारा, आंदोलन अंकुशच्यावतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना देण्यात आला.

Team Agrowon

Kolhapur News : गायीच्या दुधाचा खरेदी दर पूर्ववत करावा अन्यथा गोकुळचा दूध पुरवठा रोखू असा इशारा, आंदोलन अंकुशच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना देण्यात आला.

गाईच्या दुधाचा खरेदी दर पूर्ववत ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ९) कोल्हापूर येथे गोकुळच्या कार्यालयात डोंगळे यांची भेट घेऊन हा इशारा दिला.

या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूध उत्पादनाचा सध्याचा खर्च हा गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरापेक्षा जादा येत आहे. त्यामुळे अनेक उत्पादकांनी दूध व्यवसाय बंद करून टाकला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी परिपत्रक काढून दुधाचा दर निश्चित केला आहे. गोकुळने गायीच्या दूध खरेदी दरात वाढ करून तो ३:५/ ८:५ ला ३७ रुपये जाहीर केला होता. तो आपण कोणतेही कारण नसताना कमी केला. हा निर्णय दूध उत्पादकांसाठी नुकसानकारक आहे.

आपल्या संघांना पुरवठा केलेला ऑटो मिल्क टेस्टरमध्ये फेरफार करून उत्पादकांना फसवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यावर तत्काळ तपासणी करून हे प्रकार ओळखावेत. येथे आठ दिवसांत गाईच्या दुधाचा दर पूर्वीप्रमाणे न केल्यास शिरोळ तालुक्यातील सर्व दूध उत्पादक एकत्र येऊन आपल्या उदगावस्थित चिल्लींग सेंटरचा दूध पुरवठा रोखला जाईल, असे संघटनेच्या वतीने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT