Jalgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon APMC : जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत

APMC Market Update : एक दिवसीय बंद पाळल्यानंतर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : एक दिवसीय बंद पाळल्यानंतर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत झाले आहे. मंगळवारी (ता. २७) शेतीमालाची आवक सुरू झाली. बुधवारी (ता. २८) देखील ज्वारी, हरभऱ्याची आवक झाली. जाहीर लिलावही पार पडले.

माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी संचालक व कामगार संघटनांकडून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सोमवारी (ता. २६) बंद ठेवण्यात आले आहे.

या आंदोलनामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा; अन्यथा बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले होते. सोमवारी शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात आणणे टाळले. फक्त फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव झाले होते.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली. माथाडी, हमाल आणि व्यापारी यांनीही या आंदोलनास पूर्ण पाठिंबा दिला.

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. परंतु मंगळवारी व बुधवारी बऱ्यापैकी उलाढाल जळगाव, चोपडा व अन्य बाजार समित्यांत झाली. जळगाव बाजार समितीअंतर्गत मंगळवारी १० कोटींची उलाढाल झाली. चोपडा येथेही एक कोटींवर उलाढाल झाल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT