Maldhok  Agrowon
ॲग्रो विशेष

Maldhok Bird : माळढोकचे रहिवास ठिकाण प्रसिद्ध न करण्याचे आवाहन

Maldhok Conservation : पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या वन्यजीव गणनेत माळढोकच्या अस्तित्वावर शिक्कामोर्बत झाले.

Team Agrowon

Solapur News : पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या वन्यजीव गणनेत माळढोकच्या अस्तित्वावर शिक्कामोर्बत झाले. नंतर बार्शी तालुक्यात माळढोक आढळला त्याचा रहिवास असलेले ठिकाण काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

२३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मोहोळ, नान्नज-गंगेवाडी परिसरातील वन्यजीव विभागाच्या ताब्यातील क्षेत्रात वन्यजीव गनणा झाली. यामध्ये जिल्ह्यात माळढोकाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले होते.

मात्र, बुधवारी (ता. २९ एप्रिल) बार्शी तालुक्यातील एका गावात माळढोक फिरताना आढळला त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताना काही वर्तमानपत्रांनी माळढोकाचे नेमके लोकेशन प्रसिद्ध केले आहे.

यामुळे माळढोकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे माळढोकाचा रहिवास असलेले ठिकाण असे प्रसिद्ध करू नये, असे आवाहन जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

माळढोक पक्षी अतिशय दुर्मिळ झाला असून वर्षानुवर्षे त्याचे दर्शन होत नाही. तो दिसल्यास बघणाऱ्यांकडून त्याचे बिनधारस्तपणे लोकेशन शेअर केले जाते. त्यामुळे जेथे त्याचा अधिवास आहे तेथे हौशी लोकांची गर्दी होते. असे केल्याने या पक्षास व त्याच्या अधिवासास धोका निर्माण होऊ शकतो. पत्रकारांनी बातमी देताना लोकेशन देणे टाळावे. तरी वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार, पत्रकार व नागरिकांनी माळढोक दिसल्यास त्याची माहिती अन्य कोणालाही न देता वनविभागास देऊन माळढोक संवर्धनास हातभार लावावा. वनविभागाने याबाबत वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार, पत्रकार व स्थानि नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
- राहुल शिंदे, वन्यजीव अभ्यासक, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT