anil Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपन्यांचे प्रतिनिधी बांधावर येणार नसतील तर विमा मिळणार कसा? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सरकारला सवाल

Unreason Rain : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत करावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

Swapnil Shinde

Anil Deshmukh News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात असलेली पावसाची अनियमितता, नंतर झालेली अवकाळीमुळे आधीच शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईकडे लक्ष्य लागून राहिले आहे. तर दुसरीकडे असंख्य शेतकऱ्यांनी पीक विम्याचा मिळण्यासाठी शेतकरी कंपन्यांना फोन लावले पण फोन नॉट रिचेबल आले. अजूनही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी बांधावर येणार नसतील तर विम्याचा लाभ कसा मिळणार, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी घेतली.

अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या तूर व कापूस पिकाची आमदार अनिल देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची स्थानिक शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर वाशिम, वर्धा आणि यवतमाळ येथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात असलेली पावसाची अनियमितता, नंतर झालेली अवकाळीमुळे आधीच शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने आता झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी ७५ हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा कंपन्यांच्या कार्यपध्दतीबद्दल तक्रार केली. पिकाचे नुकसान झाल्यानंतर हक्काची मदत मिळावी, यासाठी अनेक शेतकरी विमा कंपनीला फोन करत आहे. पण कुणाचा फोन लागत नाही तर कुणाचा उचलल्या जात नाही. चूकून उचलला गेला तर योग्य उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना अग्रीम विमा मिळाली. आता पीक वाया गेल्याने १०० टक्के पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. विमा कंपन्याचे प्रतिनिधी जर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार नसतील तर त्यांना पीक विम्याचा कसा लाभ मिळणार, असा देशमुख यांनी सवाल केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT