Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Subsidy : शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीककर्ज नूतनीकरण केल्यास १०% वाढीव कर्ज व व्याज सवलत

Kharif Crop Loan Scheme : पीक कर्ज नूतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नुतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तत्काळ मंजूर करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Buldana News : पीक कर्ज नूतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नुतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तत्काळ मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या पीक कर्जाचे नुतनीकरण ३० जूनपर्यंत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सन २०२५-२६ च्या वार्षिक आराखडामध्ये खरीप हंगामासाठी एक लाख ५६ हजार ४०० खातेदांराना एक हजार ५०० कोटी लक्षांक ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत २१ हजार ४६८ शेतकऱ्यांना २४७.५९ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.

कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे असून शेतकऱ्यांना कर्ज वितरणास सुलभता व अडचणीचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शेतकरी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकरी सहाय्यता केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मंजूर होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे नुतनीकरण केल्यास १० टक्के वाढीव कर्ज बँकेकडून दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करून केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेत सहभागी व्हा

पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेंतर्गत २० रुपयांमध्ये अपघाती मृत्यू विमा संरक्षण तर पंतप्रधान जीवन ज्योती योजनेंतर्गत ४३६ रुपयांमध्ये नैसर्गिक मृत्यू संरक्षण दिला जातो. या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकी दोन लाख रुपये विमा संरक्षण दिला जातो. ज्या लाभार्थ्यांना या योजनेत सहभाग नोंदविला नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेमध्ये भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT