Crop Damage Fund Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Relief Fund : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षा कायम

Heavy Rain Crop Damage Fund : खानदेशात २०२१ व २०२२ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही भागात हा निधी प्राप्त झाला आहे, पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात २०२१ व २०२२ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही भागात हा निधी प्राप्त झाला आहे, पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

२०२२ मध्ये हानी झाली. पण त्यात नुकसानग्रस्त भागाचा मोठा समावेश पंचनामे व्यवस्थित न झाल्याने करण्यात आला नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. धुळ्यात सुमारे ८० हजार व नंदुरबारातही ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पण नुकसानीबाबतची चर्चा लोकप्रतिनिधी सध्या करीत नसल्याचे चित्र आहे. जळगाव तालुक्यात म्हसावद व परिसरात मदतनिधीचे वितरण काही शेतकऱ्यांना मागील वर्षी झाले आहे. पण फक्त १००, ४००, ४०० ० रुपये एवढा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस पिकाची मोठी हानी झाली. त्यापूर्वी पावसाने ताण दिल्याने उडीद, मुगाचे नुकसान झाले. सोयाबीनचेदेखील ६० टक्क्यांवर नुकसान झाले. फक्त ज्वारी, मक्याचे काहीसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. कापूस पिकात अतिवृष्टीनंतर नोव्हेंबरच्या मध्यात गुलाबी बोंड अळीने नुकसान केले. पिकांची अतोनात हानी झाली आहे.

पण भरपाई प्राप्त झालेली नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम कसाबसा उभा केला आहे. पंचनामे, सरसकट भरपाई, कोकणच्या धर्तीवर मदत अशी आश्वासने अनेकदा लोकप्रतिनिधी व इतरांनी दिली. परंतु भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे पपई, केळी उत्पादकांनादेखील फटका बसत आहे. काढणी रखडली आहे. दर परवडत नाही. कापसाची खेडा खरेदी ठप्प आहे. दुहेरी संकटांचा सामना शेतकरी करीत असल्याने मदतनिधीची आवश्यकता आहे. पण प्रशासन, शासन लक्ष देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

पंचनामे, सरसकट भरपाईच्या बाता ऐकल्या. अनेक आश्वासने लोकप्रतिनिधींनी दिली. पण मदतनिधी प्राप्त झालेला नाही. खरिपात सर्वच पिके हातची गेली. मजुरीचा खर्चही निघालेला नाही. कांदा पिकात मोठा तोटा शेतकऱ्यांना आला आहे. पण शासन या समस्यांची दखल केव्हा घेईल, हा प्रश्न आहे.
भिका चौधरी, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT