Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death Compensation : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे तत्काळ द्यावे

Agriculture Issue : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी मदतनिधी सरकारकडे निधी नसल्यामुळे नांदेड मधील तब्बल ९० प्रकरणात शेतकऱ्यांची वारस वाऱ्यावर असल्याची बातमी प्रकाशित केली होती.

Team Agrowon

Nanded News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी मदतनिधी सरकारकडे निधी नसल्यामुळे नांदेड मधील तब्बल ९० प्रकरणात शेतकऱ्यांची वारस वाऱ्यावर असल्याची बातमी प्रकाशित केली होती.

या या वृत्ताची नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दखल घेऊन समाज माध्यमावर आमदारांना ८२ लाख रुपयांच्या बॅग ऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळ मध्ये मदत निधी देण्याचे निवेदन केले आहे.

खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की एका वृत्तपत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याची तर दुसऱ्या वृत्तपत्रात मात्र आमदारांना अर्थसंकल्पाची प्रकाशने ठेवण्याकरिता देण्यात येणाऱ्या बॅग्ससाठी ८६ लाखाची तरतूद करण्यात आल्याची बातमी बघितली.

या दोन्ही बातम्या बघता, शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असायला हवं, याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज वाटते. राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना बॅगसाठी अशाप्रकारे महागडा खर्च करणे कोणत्याही आमदाराला पटणार नाही. मुळात अर्थसंकल्पाची पुस्तके ठेवण्यासाठी एवढ्या महागड्या बॅग्स देण्याची गरजच नाही.

शासन पेन ड्राईव्ह देत असेल तर प्रिंटेड बुक्स देण्याची सुद्धा गरज नाही आणि त्यातही सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने web site वर उपलब्ध असतील तर पेन ड्राईव्ह देण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही.

शासन ही प्रथा बंद करणार नसेल तर किमान माझ्या बॅगसाठी तरी खर्च न करता तो खर्च आवश्यक त्या ठिकाणी वळवावा. माझ्या भूमिकेशी सर्वच सदस्य सहमत असतील कोणाचे दुमत नसेल हा विश्वास आहे,त्यामुळे इतर सदस्यांनीही ही प्रथा बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती करून बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT