Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : धान खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या चकरा

Paddy MSP : नोंदणीची प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू आहे. सकाळपासून नोंदणीसाठी आलेले शेतकरी ताटकळत आहे.

Team Agrowon

Chandrapur News : जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीकरिता नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नोंदणीची प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू आहे. सकाळपासून नोंदणीसाठी आलेले शेतकरी ताटकळत आहे.

त्यामुळे सेतू केंद्रातूनही ही प्रक्रिया करावी, अशी मागणी मूल सोशल फोरमचे संयोजक विजय सिद्धावार यांनी केली. तसे निवेदन त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मूलसह आणखी दोन नोंदणी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. मात्र, अजूनही केंद्र सुरू करण्यात आले नाही.

त्यामुळे या केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. पहाटे पाच वाजेपासूनच शेतकरी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन रांगेत लागत आहे. मात्र, अनेकांची नोंदणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्यापावली फिरावे लागत आहे. काही शेतकरी तीन-चार दिवसांपासून चकरा मारूनही नोंदणी होत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे.

सध्या थंडीचे दिवस सुरू आहे. पहाटे व सायंकाळी उशिरापर्यंत या शेतकरी थंडीत कुडकुडत नोंदणीसाठी नावाचा पुकारा होईल या आशेवर खुल्या जागेत बसून असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या शेतकऱ्यांत वृद्ध महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाजार समितीत पुरेसे मनुष्यबळ आणि संसाधने नाही. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मागील वर्षीही अशाच संथ गतीने नोंदणीची प्रक्रिया झाली. परिणामी नोंदणीची मुदत शासनाला वारंवार वाढवून द्यावी लागली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT